जळगाव शहरातून तिरुपतीसह इंदूर व अहमदाबादसाठी विमानसेवा होणार सुरू ; मंत्री खडसेंना आश्वासन

भुसावळ : जळगाव विमानतळावरून तिरुपतीसह इंदूर व अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी नवी दिल्ली येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक यांच्याकडे भेटीदरम्यान केली. यावेळी मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, जळगाव विमानतळावर आयएफआर-ऑल वेदर ऑपरेशन, लॉ व्हिजीबिलिटी व नाईट लॅण्डींग अश्या स्थानिक विमान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधा आहेत. जळगावहून मुंबई व पुण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा असलीतरी व्यापारी व नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सोयीसाठी तसेच परिसरातील अधिकचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी पुण्यासाठी सायंकाळी व मुंबईसाठी सकाळी दररोज विमानसेवा सुरू करावी. दोन्ही मागण्यांबाबत दखल घेण्याचे आश्वासन मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी दिले.