जळगाव : मकर संक्रांतीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात शुद्ध सोन्याचा दर ३०० रुपयांनी वाढून ७८८०० रुपये प्रति तोळ्यावर (जीएसटीसह ८११६४) पोहोचला आहे. तर चांदीचा दर ९१००० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
सोमवारी चांदीचा दर ९२००० रुपये प्रति किलो होता, तर मंगळवारी शुद्ध सोन्याचा दर ७८५०० रुपये प्रति तोळा होता. बाजारात अशा प्रकारे दर चढ-उतार होत असल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
विशेषतः अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या २० जानेवारीच्या शपथविधीमुळे बाजाराच्या अनिश्चिततेचा मोठा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये मोठी उलाढाल होईल, असे जाणकारांचे मत आहे.
सध्याच्या परिस्थितीत बाजाराच्या अनिश्चिततेमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार सोन्याच्या खरेदीकडे अधिक आकर्षित होत असून सोन्याचे दर भविष्यात आणखी वधारणाची शक्यता वर्तवली जात आहे.