---Advertisement---

ऑनलाइन ‘डाएट प्लॅन’ फॉलो केला अन् 18 वर्षीय तरुणीने फिटनेसच्या नादात जीव गमावला

by team
---Advertisement---

आजच्या काळात सर्वांनाच तंदुरुस्त दिसायला आवडते. मुले आणि मुली अनेकदा सडपातळ दिसण्यासाठी खूप काही करतात. कधीकधी ते तंदुरुस्त आणि सडपातळ होण्यासाठी जेवणही वगळतात, परंतु अनेक वेळा जास्त डाएटिंग घातक ठरते केरळमधून असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे एका मुलीने तंदुरुस्त होण्यासाठी आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात जेवण बंद केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

केरळमधील कन्नूर येथील रहिवासी असलेल्या श्रीनंदा नावाच्या( १८ )असं मृत मुलीचं नाव आहे. श्रीनंदाने अनेक महिन्यांपासून खाणे-पिणे बंद केले होते. तिला भीती होती की तिचे वजन वाढेल, त्यानंतर ती तंदुरुस्त दिसणार नाही, परंतु हे डाएटिंग श्रीनंदासाठी मृत्यूचे कारण ठरले.

जेवण वगळल्यामुळे श्रीनंदाची प्रकृती खूप बिघडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला १२ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु तिची प्रकृती इतकी बिघडली की तिला वाचवता आले नाही आणि तिचा मृत्यू झाला.

श्रीनंदाला रुग्णालयात नेले तेव्हा तिचे वजन फक्त २४ किलो होते. तिच्या रक्तातील साखर, सोडियम आणि रक्तदाब सतत कमी होत होता, जो नियंत्रित करणे कठीण झाले आणि शेवटी तिला वाचवता आले नाही. डॉक्टरांनी सांगितले की श्रीनंदा कदाचित एनोरेक्सिया नर्वोसा नावाच्या आजाराने ग्रस्त असेल, जो एक प्रकारचा मानसिक आजार आहे ज्यामध्ये पीडित व्यक्ती स्वतःला खूप जाड समजते.

श्रीनंदाने ऑनलाइन डाएट प्लॅन घेतला होता,या प्लॅनला फॉल करत असताना ती जेवण वगळत होती आणि फक्त गरम पाणी पीत होती. ती तासन्तास व्यायाम करायची आणि अजिबात जेवण करत नव्हती. तिने हे तिच्या कुटुंबापासून लपवून ठेवले होते आणि शांतपणे व्यायाम करत राहिली. तिने खाणे देखील बंद केले होते.परंतु हे डाएटिंग श्रीनंदासाठी मृत्यूचे कारण ठरले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की तरुणांनी सोशल मीडियावर येणाऱ्या डाएट प्लॅन फॉलो करणे टाळावे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment