रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी ‘हे’ नावं चर्चेत

---Advertisement---

 

महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात या नावाभोवती मोठा वाद निर्माण झाला आहे. स्वतःला भविष्यवेत्ता म्हणून सादर करत अनेक महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणात शंभराहून अधिक व्हिडिओ असल्याची चर्चा असून, त्यातील काही क्लिप्स आणि फोटो सोशल मीडियावर फिरत असल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर या सर्व घडामोडी उघडकीस आल्या.

या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्यावरही टीकेची झोड उठली. विविध धार्मिक कार्यक्रमांत त्या अशोक खरातसोबत दिसल्याचे फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. वाढत्या दबावामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाशी संबंधित असल्याने, पुढे हे पद कोणाकडे जाणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीला हे पद दुसऱ्या पक्षाकडे जाईल का, अशी चर्चा होती; मात्र प्राथमिक माहितीनुसार अध्यक्षपद पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नव्या अध्यक्षासाठी पुण्यातुन वैशाली नागवडे यांचं नावं चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---