बांगलादेशींना दस्तावेज म्हणजे ‘व्होट जिहाद’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिर्डी :  बांगलादेशी घुसखोरांनी बनावट दस्तावेजांद्वारे राज्यात मतदानाचा अधिकार मिळवणे म्हणजे ‘व्होट जिहाद’चा दुसरा भाग आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी म्हटले. नोव्हेंबरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फडणवीस यांनी २०२४ च्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा विमुवातीला मायाविरुद एका समुदायाने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याची उदाहरणे दिली होती आणि त्याला ‘व्होट जिहाद’ असे संबोधले होते.

व्होट जिहाद-२ चा भाग म्हणून बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र मागत आहेत, असे फडणवीस यांनी अहल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील भाजपाच्या अधिवेशनात सांगितले. अमरावती आणि मालेगाव तहसीलमध्ये असे जवळपास १०० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ५० वर्षे वयोगटातील ही लोकं बेकायदेशीररीत्या दस्तावेज मिळवत आहेत. एकाही घुसखोराला महाराष्ट्रात राहू देणार नाही, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. त्यांचे सरकार जाती आधारित आणि जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अराजकतावादी शक्तींचा सामना करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.

८९ टक्क्यांचा स्ट्राईक रेट

भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे. ज्याने मागील ३० वर्षांत सलग तीन निवडणुकांत १०० जागांचा टप्पा ओलांडला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला आणि भाजपाला ८९ टक्क्यांच्या स्ट्राईक रेटसह १३२ जागा मिळाल्या, असे फडणवीस म्हणाले.