संसद : संसदेचे विशेष अधिवेशन सत्र सुरु चालू व्हायला अजून पाच दिवस बाकी आहेत, पण त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने 17 सप्टेंबरला नवीन संसद भवनावर औपचारिकपणे तिरंगा फडकवण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणारे विशेष अधिवेशन जुन्या इमारतीत सुरू होणार आहे. त्यानंतर संसद भवनाचे पुढील कामकाज नवीन संसदेत होईल. 28 मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नव्या संसदेत होणारे हे पहिले अधिवेशन असेल. मंगळवारी नवीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक संबोधन प्रणाली भाड्याने घेण्यासाठी निविदा जारी करून तीन औपचारिक प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या गज गेटसमोर “राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाची” तयारी सुरू केली.
या अधिवेशनाबाबत नवीन बातमी समोर आली आहे ती अशी कि संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोडही लागू केला जाणार आहे. असे लोकसभेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.