चाळीसगाव : तालुक्यातील ४० किलोमीटरच्या १७ रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. याबाबत आ. मंगेश चव्हाण यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सदर मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ‘संशोधन आणि विकास’ या हेड अंतर्गत तालुक्यातील ४० किलोमीटरच्या १७ रस्त्यांना त्यांनी मंजुरी दिली. विशेष म्हणजे, चाळीसगाव मतदारसंघात प्रथमच एकाचवेळी ४० किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी दिल्याने एकप्रकारे चाळीसगाववासीयांना मंत्री महाजन यांनी विकासरुपी भेटच दिली आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.
या रस्त्यांचे काम दर्जेदार होणार असून, गावांतर्गत कॉंक्रिट रस्ते, आवश्यक त्या ठिकाणी छोटे पूल, पाइप, मोऱ्या, संरक्षकभिंती आदी कामांचा यात समावेश असणार आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे देखभाल दुरुस्ती देखील सबंधित ठेकेदाराकडे असणार आहे.
या गावातील रस्त्यांना मंजुरी
तळोंदा प्र. दे. ते पिंपळवाड निकुंभ (४.३० किमी), ब्राम्हणशेवगे ते हिरापूर (५ किमी), पिंपरखेड – शिवापूर रस्ता (१ किमी), पिंपळवाड निकुंभ ते माळशेवगे रस्ता (४ किमी), पिलखोड ते तामसवाडी रस्ता (१.५ किमी), वाकडी ते मुंदखेडा बुद्रुक व खुर्द रस्ता (३.५ किमी), खेर्डे फाटा ते खेर्डे- सोनगाव रस्ता (१.२० किमी), रामा २११ ते बोढरे रस्ता (२ किमी), हिंगोणे खुर्द ते तांदुळवाडी रस्ता (२ किमी), न्हावे वडाळा रस्ता ते ढोमणे गाव (१.५ किमी), लोंढे ते विसापूर रस्ता (१ किमी), रोकडे फाटा ते रोकडे तांडा रस्ता (१ किमी), खडकी बुद्रुक ते तांबोळे खुर्द रस्ता (३ किमी), रामा २११ ते जुनोणे रस्ता (३ किमी), रामा २११ ते वडगाव लांबे रस्ता (३ किमी), हातले ते हातले तांडा रस्ता (१ किमी), रामा २११ ते नवे दसेगाव रस्ता (२ किमी).