जळगाव: जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष शंकर उमाळे हे पत्नी मंगला उमाळे यांच्या सोबत रामेश्वर कॉलनीमध्ये राहतात.शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी मंगला उमाळे ६ वाजता कामावरून घरी आल्यवरती तिच्या पतीने सुभाष उमाळे तिला स्वयंपाक करण्यास सांगितले .
पण तिची तब्यत बरी नव्हती आणि तिने तिच्या पतीला संगितले मी आता कामावरून आली आहे. थोड्यावेळाने स्वयंपाक करते असे पत्नी मंगला यांनी सांगितले.याच गोष्टीचा राग आल्याने सुभाष उमाळे याने हाता विळा घेवून पत्नी मंगला यांच्या उजव्या कानावर वार करत जखमी केले. हा प्रकार पाहिल्यानंतर शेजारी राहणाऱ्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती सुभाष शंकर उमाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.