तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । अवैधरित्या विनापरवाना विदेशी दारु नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे आज रात्री २.१७ च्या सुमारास तालुका पोलिसांनी जप्त केला. यात तब्बल ४२ लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकणी एकाविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे नेतृत्वाखाली त्यांचे पथकांना कोपर्ली गावातील इलेक्ट्रीक सबस्टेशनच्या पुढे मोठी भिलाटीत मध्ये एका बंद घरात 42 लाखांची विदेशी दारु आढळून आली असता घर मालक नामे प्रल्हाद मधु पवार वय-29 रा. कोपर्ली ता.जि. नंदुरबार यांस ताब्यात घेतले. दरम्यान, सदरची विदेशी दारु कोठून आणली ? याबाबत विचारले असता त्याने विदेशी दारु सतु भिल ऊर्फ सत्तार ठाकरे रा. म्हसावद ता.शहादा जि. नंदुरबार याची असल्याचे सांगितन सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रल्हाद मधु पवार वय-29 रा. कोपर्ली ता.जि. नंदुरबार सतु भिल ऊर्फ सत्तार ठाकरे रा. म्हसावद ता. शहादा जि. नंदुरबार यांचेविरुध्द् नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी कारवाई केली
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उप विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उप निरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस नाईक/ राजु गावीत, साहेबराव जाधव, राजेंद्र धनगर, चुनिलाल वसावे, पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, करणसिंग वळवी, महिला पोलीस अंमलदार गीता लोहार यांच्या पथकाने केली.