जळगाव : महिलांसाठी प्रबोधन समिती गठीत करा अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. रुपाली चाकणकर ह्या जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत.
निवेदनाचा आशय असा की, काही वर्षापासून जळगाव जिल्हा मध्ये तरुणी ज्यांचे वय वर्ष 14 ते 27 -28 वयातील विद्यार्थिनी व महिलांवर अत्याचाराचे आत्महत्येचे व कमी वयात पळून जाण्याचे घर सोडून पळून जाण्याचे प्रमाण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहे , तरी या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे 13 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या संदर्भात प्रबोधन समिती घटित व्हावी यासाठी आमच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले होतं, तसेच 8 सप्टेंबर रोजी राज्यपाल महाराष्ट्र सी. पी. राधाकृष्णन यांच्याही जळगाव दौऱ्यावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडला असता त्यांनी हा विषय अति गांभीर्य असून याच्यावर चर्चा करून अति जलद निर्णय घेण्यात येईल, अशी त्यांनी ग्वाही दिली आहे.
असे प्रकार थांबविण्यासाठी जिल्ह्यात प्रबोधन समिती गठीत करावी त्यात निवृत्त न्यायाधीश , निवृत्त मनसोपचार डॉक्टर्स, निवृत्त प्राध्यापक, निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकारी, आणि काही स्वयंसेवक स्वयंसेविका या प्रबोधनकार समितीमध्ये घावेत. प्रत्येक महिन्याला शाळेत व महाविद्यालय येथे जाऊन मुलींना प्रलोभन करून कॉन्सलिंग करून आत्महत्याविषयी घर सोडून पळून जाण्याविषयी, अत्याचाराविषयी त्यांची समजूत काढून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करावा.
एका सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये आत्महत्या, पळून जाणे या प्रकारात जळगाव जिल्हा दुसरा क्रमांक वर आहे. त्यात मागील वर्षी विद्यार्थी विद्यार्थिनींची आत्महत्या २८० ते २८५ पर्यंत गेलेली आहे. २० टक्के शुल्लक कारणावरून आत्महत्या, ३५ टक्के शैक्षणिक दबाव, २५ % प्रेम प्रकरणातून १५ टक्के लैंगिक शोषणामुळे अशा प्रकारचे आत्महत्या जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहे. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रबोधन समिती गठीत करून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला शाळेत महाविद्यालयात येथे जाऊन ही टीम प्रबोधन करेल अशा पद्धतीने हे काम मार्गी लागलं पाहिजे. अशी मी आपणास कळकळीची मनसे विनंती करतो, आणि लवकरात लवकर ही समिती घटित होऊन महाराष्ट्राच्या विद्यार्थी विद्यार्थिनी महिलांना अमृत दान द्यावे.
याप्रसंगी मनसे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सोबत विनोद शिंदे शहराध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक श्रीकृष्ण मेंगडे शहर संघटक योगेश पाटील जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना कल्पेश पवार विद्यार्थी सेना चेतन पवार अनिल दिघे राजू डोंगरे शहर सचिव खुशाल ठाकूर राहुल चव्हाण शहर उपसंघटक निलेश वाणी विभाग अध्यक्ष साजन पाटील उपजिल्हा संघटक अनिल दिघे हरिओम सूर्यवंशी दीपक राठोड आणि आजी-माजी पदाधिकारी व सर्व संघटनेचे अधिकारी उपस्थित होते