भारतीय क्रिकेट संघाचे माजी महान क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा भाऊ विनोद सेहवाग याला चंडीगढच्या मनीमाजरा पोलिस पोलिसांनी ७ कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात अटक केली आहे. न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
बद्दी (हिमाचल प्रदेश) येथील श्री नैना प्लास्टिक फॅक्टरीचे मालक कृष्णा मोहन यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की दिल्लीच्या ‘जालता फूड अँड बेव्हरेजेस’ कंपनीने त्यांच्या कारखान्यातून काही वस्तू खरेदी केल्या आहेत. त्याच्या पेमेंटसाठी कंपनीने ७ कोटी रुपयांचा चेक जारी केला होता. परंतु जेव्हा तक्रारदाराने हा चेक मनीमाजरा येथील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये जमा केला तेव्हा खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने चेक बाउन्स झाला.
तक्रारदाराला पैसे न मिळाल्याने त्यांनी कलम १३८ (निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट) अंतर्गत न्यायालयात खटला दाखल केला. परंतु आरोपी न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने २०२२ मध्ये तिघांनाही फरार घोषित केले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
न्यायालयाच्या आदेशानंतर २५ सप्टेंबर २०२३ रोजी चंदीगडच्या मनीमाजरा पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध कलम १७४ (न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल केला. अटकेनंतर विनोद सेहवागने त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या १७४ प्रकरणांमध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने १० मार्च २०२५ पर्यंत यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश मणिमाजरा पोलीस ठाण्याला दिले आहेत.
याशिवाय चेक बाउन्सशी संबंधित १३८ प्रकरणांची सुनावणी न्यायालयात होणार आहे. या सुनावणीत इतर आरोपींवर पुढील काय कायदेशीर कारवाई करायची हे ठरवले जाईल.
विनोद सेहवाग यापूर्वीही वादात
विरेंद्र सेहवागचा भाऊ विनोद सेहवागचे नाव यापूर्वीही आर्थिक अनियमितता आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये समोर आले आहे. मात्र, यावेळी त्याच्या अटकेनंतर हे प्रकरण गंभीर झाले आहे आणि सर्वांच्या नजरा न्यायालयाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
पूर्व क्रिकेटर विरेंद्र सेहवागच्या भावाला अटक; नेमकं प्रकरण काय?
