मुंबई : भारतीय हॉकी टीमचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ते ४६ वर्षांचे होते. उत्तर प्रदेशातील वाराणसी (नारायणपूर) येथे राजीव मिश्रा वास्तव्यास होते. दरम्यान, त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी यासंबंधीची माहिती स्थानिक पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीसांनी या त्यांच्या घरात जाऊन पाहिले असता त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या बातमीनंतर क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.
शेजारी लोकांनी तक्रर केल्या नंतर समजला प्रकार
हॉकीपटू राजीव मिश्रा हे १९९७ मधील ज्युनियर हॉकी विश्वचषकात महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली होती. या विश्वचषकात भारताला रौप्यपदक मिळाले होते. या विश्वचषकाच्यावेळी हॉकीपटू मिश्रा यांनी नऊ गोल केले होते. हा विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळवला गेला होता. तसेच, ते इंग्लंडमधील १९९७ च्या ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होते याविश्वचषकात भारत उपविजेता ठरला होता. मृत्यूसमयी मिश्रा हे रेल्वेत नोकरीला होते. त्यांच्या काही सहकाऱ्यांनी म्हटले आहे की, राजीव मिश्रा यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा कारण त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांत केली. तसेच, त्यांचे कुटुंबीय लखनऊ येथे वास्तव्यास होते.