---Advertisement---

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांचे निधन

by team
---Advertisement---

SM Krishna: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एसएम कृष्णा यांनी आज (१० डिसेंबर) सकाळी २.४५ च्या सुमारास बंगळुरू येथील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. एस. एम. कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. एस. एम कृष्णा यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुली आहेत.

एस. एम. कृष्णा यांचा परिचय

एस. एम. कृष्णा हे राजकारणातले दिग्गज नेते मानले जात. आपल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल या पदांसह अनेक महत्त्वाची सार्वजनिक पदं भुषवली होती. एसएम कृष्णा यांचा जन्म 1 में 1932 साली कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील मद्दुर तालुक्यातील सोमनहल्ली गावात झाला. त्यांचं पूर्ण नाव सोमनहल्ली मल्लया कृष्णा असं होतं.

शिक्षण

एस. एम. कृष्णा यांचं प्राथमिक शिक्षण हत्तूर येथे झाले. तर त्यांनी माध्यमिक शिक्षण श्री रामकृष्ण विद्याशाळा, म्हैसूर येथून घेतलं. त्यानंतर म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी आणि आणि युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी पूर्ण केली.अमेरिकेतील सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठ आणि वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली.

राजकीय प्रवास

एस. एम कृष्णा यांचा राजकीय प्रवास १९६० च्या दशकात सुरू झाला. एसएम कृष्णा यांनी 1962 मध्ये मद्दूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला. यानंतर त्यांनी ‘प्रजा सोशलिस्ट पार्टी’मध्ये प्रवेश केला, परंतु 1967 च्या निवडणुकीत ते मद्दूरमधून काँग्रेसच्या एमएम गौडा यांच्याकडून पराभूत झाले.

1968 मध्ये एस. एम. कृष्णा हे मंड्या या मतदारसंघातून खासदार झाले. अत्यंत अल्प कालावधीत १९६८ ते १९७० आणि १९७१ ते ७२ अशा कालावधीत ते दोनदा खासदार झाले. त्यावेळी काँग्रेसचा बालेकिल्ला मंड्या हा मतदारसंघ वाचवण्यात एसएम कृष्णा यांची महत्त्वाची भूमिका होती.

कर्नाटकचे मुख्यमंत्री

एस एम कृष्णा हे कर्नाटकातील काँग्रेसचे मोठे नेते होते आणि राज्याच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव होता. 1999 ते 2004 या काळात ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. नंतर ते मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रीही राहिले. मार्च 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

महाराष्ट्राचे राज्यपाल

डिसेंबर 2004 ते मार्च 2008 पर्यंत ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये एसएम कृष्णा यांनी परराष्ट्र मंत्रीपदही भूषवले होते. जानेवारी 2023 मध्ये एसएम कृष्णा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment