निवडणूक प्रभारीपदी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार : विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत अक्कलकुवा विधानसभा आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबत सचिव भाऊसाहेब चौधरी यांना गुरुवारी नियुक्तीपत्र ई दिले. रघुवंशी यांच्या नियुक्तीचे सर्वत्र ने अभिनंदन करण्यात येत आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब  ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ‘निवडणूक प्रभारी’ आणि ‘विधानसभा निरीक्षकांच्या’ नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अक्कलकुवा विधानसभा व धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

सर्व समाजातील प्रमुखांना स्थान

संबंधित कार्यक्षेत्रामध्ये शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनांच्या नियुक्तीसाठी शिफारस करणे आणि आवश्यक ते बदल करण्यासाठी शिफारस करणे तसेच शिवसैनिकांना त्यांचे कार्य व जबाबदाऱ्या सोपविणे. विधानसभा क्षेत्रात ‘शिवसेना सदस्य नोंदणी अभियान’ आणि ‘मतदार नोंदणी अभियान’ सक्रियपणे राबविणे. शिवसेना शाखांना भेटी देणे तसेच जास्तीत जास्त शाखा उ‌द्घाटनावर भर देणे. विधानसभेतील सर्व बूथप्रम ख तसेच बूथ कमिटी सदस्यांच्या नियुक्त्यांची पूर्तता करणे. विभागातील संभाव्य प्रवेशांबाबत पक्षाला कळविणे. विधानसभा क्षेत्रांमध्ये सर्व समाजातील प्रमुख घटकांना प्रतिनिधित्व देणे. विभागनिहाय तसेच प्रत्येक पंचायत समिती गण, प्रभागनिहाय आढावा बैठका घेऊन शिवसैनिकांना पक्षाचा कार्यक्रम नेमून देणे.

पक्ष बांधणीच्या दृष्टीकोनातून तयारी

शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांबाबत ग्रामीण तसेच शहरी भागात प्रसार करून त्याची अधिकाअधिक अंमलबजावणी करण्यावर भर देणे. प्रत्येक समाजाचा विधानसभा प्रमुख/अंगीकृत संघटना पदाधिकारी नेमण्यासाठी शिफारस करणे. उपक्रम आणि कार्यक्रम संबंधित कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविणे आणि संघटना वाढीसाठी योगदान देणे. आगामी निवडणुकांच्या तसेच पक्ष बांधणीच्या दृष्टीकोनातून जोमाने तयारीस लागण्याचे आवाहन नियुक्ती पत्रात म्हटले आहे.