बेळगावमध्ये आज दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत, गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार (वय 69) यांचा मृत्यू झाला आहे. खडेबाजार परिसरातील शिवानंद लॉजजवळ त्यांच्या कारचा एका रिक्षाला किंचित स्पर्श झाला, ज्यामुळे रिक्षाचालक आणि मामलेदार यांच्यात वादावादी झाली. वादादरम्यान रिक्षा चालकानं अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये माजी आमदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा आज शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडे बाजार परिसरात खून झाला आहे. एका रिक्षा चालकाने केलेल्या जोरदार हल्ल्यात मामलेदार यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.
गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार हे बेळगाव येथील खाडेबाजार परिसरात असलेल्या श्रीनिवास लॉजमध्ये उतरले होते. आज दुपारी ते आपली कार घेऊन येत असताना एका रिक्षाला कारची धडक बसली. यावरून मामलेदार आणि रिक्षाचालकात वादावादी झाली. यावेळी रिक्षा चालकाने मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. मामलेदार त्या हल्ल्यातून सावरत लॉजकडे निघाले असतानाच रिसेप्शन काउंटर जवळ कोसळले.
हेही वाचा : Crime News: जालन्याची मोनिका ठरली ‘लव्ह जिहाद’ची बळी; शेतात नेत इरफानने केले असे की, अंगावर येईल काटा
मारहानीनंतर घाबरल्याने रक्तदाब कमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे उत्तरीय तपासणीत स्पष्ट होणार आहे . परंतु, पोलिसांनी सदर रिक्षा चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, खडेबाजार व मार्केटचे पोलीस निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
हेही वाचा : धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १ ९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू
लहू मामलेदार हे 2012 ते 2017 या कालावधीत गोव्यातील फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. 2012 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मात्र, 2017 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव काँग्रेस पक्षाचे रवी नाईक यांच्याकडून झाला. मामलेदार तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, परंतु डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि जानेवारी 2022 मध्ये काँग्रेसमध्ये सामील झाले.