वागदर शिवारात चार बिबट्यांचा संचार, शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

---Advertisement---

 

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील वागदर शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या संचार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सप्ताहात दोन दिवसापूर्वीच एकाच वेळी चार बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शेतकरी दिपेश गांगुर्डे यांच्या शेतात मका कापणीचे काम सुरू असताना दुपारच्या सुमारास अचानक डोंगराकडून दोन मोठे व दोन लहान असे चार बिबटे खाली येताना दिसले. शेतात मका कापणी करत असलेल्या मजुरांच्या दिशेने हे बिबटे धावत आल्याचे पहाताच मजुरांनी मजुरांनी काम अर्धवट सोडून जीव वाचवण्यासाठी शेताबाहेर धाव घेत पळ काढला.

एकाच वेळी शेतमजूरांचा गलबलाट गोंधळ आणि आरडाओरड झाल्याने बिबटेही आले तसे दुसऱ्या दिशेने निघून गेले. मात्र या घटनेमुळे मजुरांम ध्ये तीव्र भीती पसरली असून अनेक मजूर आता त्या भागात काम करण्यास तयार नाहीत. यासंदर्भात वागदर शिवारात दिवसाच्या वेळी मका कापणी करणाऱ्या शेतमजूरांना एकापाठोपाठ चार बिबट दिसल्याने शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाकडे धाव घेतली. व बिबटचा पिंजरे लावून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली.

दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनीही वनविभागाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली. नगरसेवक गणेश खैरणार यांनी शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित यांना घटनास्थळी बोलावले. डॉ. गावित यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय ढोले यांची भेट घेऊन प्रशासनाच्या संथ कामकाजावर तीव्र टीका केली.

गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी वन्य प्राण्यांच्या भीतीदायक दहशतीच्या वातावरणात जगत असून वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी उपवनसंरक्षक नायकवाडी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वागदर शिवारात तातडीने पिंजरा लावण्याचे आदेश देण्याची मागणी केली. कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्यास वनविभाग जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---