धुळे : पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याच्या कारणावरून समतानगरात एका घरकाम करणाऱ्या विवाहितेला चौघांनी शिवीगाळ करीत कुन्हाडीसह लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना २६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. संशयित शंकर रतन साळुंखे, चेतन रतन साळुंखे, रतन नामदेव साळुंखे, अनिकेत गावंडे (सर्व रा. धुळे) यांनी कुन्हाडीसह लोखंडी पाइपने मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडकेत अनोळखी ठार, पाच महिन्यांनंतर गुन्हा
धुळे : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक अनोळखी तरुण ठार झाल्याची घटना सुमारे पाच महिन्यांपूर्वी १ डिसेंबरला घडली होती. याप्रकरणी अद्यापही अनोळखी तरुणाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोतया पोलिसांनी वृद्ध शेतकऱ्याला ठगले
धुळे : तालुक्यातील कुसुंबा येथे नारायण दगडू शिंदे (वय ७७, रा. कुसुंबा, ता., जि. धुळे) या दुचाकीस्वार वृद्ध शेतकऱ्यास पोलिस असल्याचे बतावणी करीत भामट्यांनी सोन्याव्या वेनसह अंगठी काढून घेत पोबारा केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे रेल्वेगाडीच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. इंदूबाई धर्मा वळवी (४०) रा. निंबोणी, ता. नवापूर असे मयत महिलेचे नाव आहे. खांडबारा येथे रेल्वे रूळ ओलांडत असताना त्यांना मालगाडीने धडक दिली. यात इंदूबाई यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद आहे.