---Advertisement---

भामरागडच्या जंगलात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान

by team
---Advertisement---

गडचिरोली : गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेल्या भामरागडमधील कोपरीच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन ते चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर या चकमकीत एक पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे.

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा जंगल परिसर आहे. या कोपरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याचा गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी योजना आखात जंगलात ऑपरेशन राबविले. यात तीन ते चार नक्षलवादी ठार झाले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्माराव आत्राम आज निवडणुकीच्या प्रचारासाठी भामरागड दौऱ्यावर आहेत. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आत्राम यांना पोलिसांच्या मोठा बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment