---Advertisement---

व्यवस्थापन परिषदेच्या संस्था चालक गटातून नंदकुमार बेंडाळेंसह चार जण विजयी

by team
---Advertisement---

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या गटामधून  संस्था चालक खुला संवर्गातील ४ जागासाठी ६ उमेदवार रिंगणात होते. व्यवस्थापन परिषदेच्या गटामधून खुला संवर्गातून नंदकुमार बेंडाळे, व्ही.टी.जोशी, निशांत रंधे, डॉ.एस.टी.पाटील हे चार उमेदवार निवडून आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणातील काही जागांसाठी  ८ जानेवारी रोजी मतदान झाले होते.  जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील १९ मतदान केंद्रातील २५ बुथवर मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्याचा निकाल आज १० रोजी घोषीत झाला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment