---Advertisement---

दरोड्यातील चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा उघड

---Advertisement---

तालुका पोलीस ठाण्यात सुझलॉन कंपनीत सुरक्षारक्षकास आठ ते दहा जणांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवून साडेआठ हजारांच्या रोख रकमेसह कॉपर केबल, पॅनल असा सुमारे ७३ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याप्रकरणी चौघा संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. इतर संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.

तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सुझलॉन कंपनीच्या टॉवरजवळ सुरक्षारक्षक म्हणून सुदर्शन सिक्युरिटीचे नितीन माधवराव धनगर (वय ३६, रा. कोकणी हील, नंदुरबार) नियुक्त असताना आठ ते दहा जणांनी धनगर यांच्यासह इतरांना धारदार शस्त्र दाखवून त्यांच्याजवळील आठ हजार ५०० रुपये रोख तसेच टॉवरवरील ७२ हजार ९२० रुपयांची कॉपर केबल, पॅनल असा मुद्देमाल लांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला होता.

याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुन्ह्यातील काही संशयित तालुका पोलीस ठाणे हद्दीतील बलवंड येथील असून, ते गावातच आहेत, याबाबत गोपनीय माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लगेच पथकास खाना केले.

पथकाने बलवंड येथे शोध घेतला असता, तेथे चार संशयित मिळून आले. त्यांना त्याचे नाव, गाव विचारता, पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी (वय २१, रा. रजाळे, ता. जि. नंदुरबार), राज ऊर्फ भटू भास्कर हटकर (वय २०, रा. शनिमांडळ, ता. जि. नंदुरबार), अजय हिम्मत भिल (वय २७, रा. बलवंड, ता. जि. नंदुरबार), नीलेश आनंदा पानपाटील (वय २२, रा. बलवंड, ता. जि. नंदुरबार) अशी नावे सांगितली. त्यांना पथकाने ताब्यात घेत त्यांना उर्वरित साथीदारांबाबत विचारता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

उर्वरित संशयित फरार असून, त्याबाबतचा तपास सुरू आहे. ही कामगिरी ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार मुकेश तावडे, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, पोलीस शिपाई अभय राजपूत आर्दीच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---