प्रवाशांनो लक्ष द्या ; चार गाड्या टर्मिनेट तर आठ गाड्यांचे मार्ग बदलले, ३८ गाड्या रद्द

भुसावळ : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधील नागपूर विभागातील कलमना रेल्वे स्टेशन येथे राजनांदगाव ते कलमना दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनीला कनेक्टिविटी प्रदान करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग काम केले जात आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल ३२ रेल्वे गाड्या रद्द, चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट तर आठ गाड्यांचे मार्ग बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय होणार आहे.

या रेल्वे गाड्या रद्द
नागपूर विभागात घेण्यात आलेल्या ब्लॉकचा फटका मोठ्या प्रमाणावर प्रवासी गाड्यांना बसत आहे. यामुळे चार महिने अगोदर आरक्षण करून वेळेवर गाड्या रद्द होत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये गाडी क्रमांक १२८३४ हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस प्रवास (१० आणि ११ ऑगस्टला रद्द), गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस (१३ व १४ ऑगस्टला रद्द), हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस (५. ७, ११ आणि १२ ऑगस्टला रद्द), मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस (७, ९, १३ आणि १४ ऑगस्टला रह), शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (११ ते १७ ऑगस्टपर्यंत रद्द).

लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस (१३ ते १९ ऑगस्टपर्यंत रद्द), हटिया-पुणे एक्सप्रेस (५ व ९ ऑगस्टला रद्द), पुणे-हटिया एक्सप्रेस (७ व ११ ऑगस्टला रद्द), भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (८ व १५ ऑगस्टला रद्द), लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्सप्रेस (१० व १७ ऑगस्टला रद्द), हटिया लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (१६ ऑगस्टला रद्द), लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया एक्सप्रेस (१८ ऑगस्टला रद्द), हावडा-पुणे दुरांतो एक्सप्रेस (१५ ऑगस्टला रद्द), पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस (१७ ऑगस्टला रद्द), पुरी-साई नगर शिर्डी एक्सप्रेस (९ व १६ ऑगस्टला रद्द), साई नगर शिर्डी- पुरी एक्सप्रेस (११ व १८ रोजी रद्द).

गांधीधाम-पुरी एक्सप्रेस (१६ रोजी रद्द), पुरी-गांधीधाम एक्सप्रेस (१९ रोजी रद्द), ओखा-बिलासपूर एक्सप्रेस (१० आणि १७ ऑगस्टला रद्द), बिलासपूर-ओखा एक्सप्रेस (१२ व १९ रोजी रद्द), संतरागाची- पुणे एक्सप्रेस (१७ ऑगस्टला रद्द), पुणे-संतरागाची एक्सप्रेस (१९ रोजी रद्द), हावडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेस (८ व १५ ऑगस्टला रद्द), साईनगर शिर्डी-हावडा एक्सप्रेस ही गाडी (१० आणि १७ रोजी रद्द), ओखा -शालिमार एक्सप्रेस (१८ रोजी रद्द), शालिमार ओखा एक्सप्रेस ही गाडी (२० रोजी रद्द), गांधीधाम- पुरी एक्सप्रेस ही गाडी (१४ रद्द), पुरी-गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी (१७ रोजी रद्द), पुरी-सुरत एक्सप्रेस ही गाडी (११ रोजी रद्द), सुरत-पुरी एक्सप्रेस ही गाडी (१३ रोजी रद्द), पुरी-अजमेर एक्सप्रेस ही गाडी (१, ५ आणि ८ ऑगस्टला रद्द) तसेच अजमेर-पुरी एक्सप्रेस ही गाडी (६, ८ आणि १३ ऑगस्टला रद्द). या गाड्या केल्या शॉर्ट टर्मिनेट मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस ही गाडी १३ ते १८ ऑगस्टपर्यंत वर्धा स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेशन केली आहे. ही गाडी वर्धा ते गोंदिया दरम्यान रद्द राहील. गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस १४ ते १९ ऑगस्टपर्यंत गोंदिया ऐवजी वर्धा येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी गोंदिया-वर्धा दरम्यान रद्द राहील. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी १२ ते १७ ऑगस्टपर्यंत वर्धा स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेशन केली आहे. ही गाडी वर्धा ते गोंदिया दरम्यान रद्द राहील. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस १४ ते १९ ऑगस्टपर्यंत गोंदिया ऐवजी वर्धा येथून सुटेल. गाडी गोंदिया-वर्धा
दरम्यान रद्द राहील.

या गाड्यांचे मार्ग बदलले
लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस ही गाडी १४ व १५ ऑगस्टला भुसावळ, इटारसी, न्यू कटनी जंक्शन, बिलासपूर मार्ग वळवली जाईल. भुसावळ ते बिलासपूर दरम्यान गाडी रद्द राहील. शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी १४ व १५ रोजी बिलासपूर, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळ मार्गे वळवली जाईल. बिलासपूर ते भुसावळ दरम्यान गाडी रद्द राहील. कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी ३. १० आणि १७ ऑगस्टला बर्धमान जंक्शन, आसनसोल, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळमार्गे वळवली जाईल. लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या एक्सप्रेस ही गाडी ६, १३ व २० ऑगस्टला भुसावळ, इटारसी, न्यू कटनी जंक्शन, आसनसोल, बर्धमान जंक्शन मार्ग वळवली जाईल. मालदा टाउन सुरत एक्सप्रेस ही गाडी १० आणि १७ ऑगस्टला आसनसोल, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळ मार्ग वळवली आहे. सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस १२ आणि १९ ऑगस्टला भुसावळ, इटारसी, न्यू कटनी जंक्शन, आसनसोल मार्ग वळवली जाईल. विशाखापट्टम-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दि. १८ ऑगस्टला विशाखापट्टम, विजयवाडा, बल्लारशाह, वर्धा, भुसावळ मार्गे वळवली जाईल. लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टम एक्स्प्रेस ही गाडी २० ऑगस्टला भुसावळ, वर्धा, बल्लारशाह, विजयवाडा, विशाखापट्टम मार्गे वळवली जाईल. प्रवाशांनी रद्द, बदललेल्या मार्गाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेत्वे प्रशासनाने केले आहे.