---Advertisement---

विद्यालयात चोरी करणारे चौघे गजाआड

by team
---Advertisement---

जळगाव : शासकीय तंत्र विद्यालयातील संगणक आणि लेझर प्रिंटरचा चोरी करणारे चौघे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे, त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवार, 22 डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेनंतर ही घटना घडली. यात 20 हजार रुपये किंमतीचा संगणक आणि 5 हजार रुपये किमतीचे प्रिंटर चोरी झाले होते. भांडारपाल बाळकृष्ण तुकाराम पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला याप्रकरणी फिर्याद दिली होती.

एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील गोपाल हरी जगताप, राहुल लक्ष्मण राजपुत, वाल्मिक नगरातील ऋषीकेश श्रीराम कोळी आणि खोटे नगरातील शुभम सुनिल तायडे अशा चौघांना या गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयापाल हिरे यांच्या पथकातील एएसआय अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, किशोर पाटील, सचिन पाटील, मुकेश पाटील, छगन तायडे, विशाल कोळी आदींनी संशयीतांना ताब्यात घेतले. चौघांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यांना पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment