---Advertisement---

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणुक करणाऱ्या डॉक्टर महिलेला अटक

by team

---Advertisement---

नागपूर : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली होत असलेल्या व वर्षाच्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अद्याप फरार असले, तरी वर्ध्यातील एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टर असलेला तिचा पतीदेखील आरोपी आहे. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

डॉ. प्रीती नीलेश राऊत, असे अटक केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. विराज सुहास पाटील (दहीसर, मुंबई) हा या रॅकेटचा सूत्रधार आहे. कोलकाता ‘ईडी’ने पाटील याच्यावर ‘पीएमएलए’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अटक केल्यापासून पाटील कोलकाता तुरुंगात आहे.

वर्धा येथील सूरज सावरकर याच्या मदतीने त्याने नाइन अकॅडमी प्रा. लि. नावाची कंपनी सुरू केली होती. प्रीती आणि तिचा पती डॉ. नीलेश यांच्यासोबत सुरेंद्र मधुकरराव सावरकर (सेलू, वर्धा), प्रियंका खन्ना (जालंधर, पंजाब), पी. आर. ट्रेडर्सचा प्रिन्सकुमार, एम. आर. ट्रेडर्सचा राकेश कुमार सिंग, टी. एम. ट्रेडर्सचा अमन ठाकूर, आर. के. ट्रेडर्सचा राहुल कुमार अकेला व ठाण्यातील मिलन एंटरप्रायझेस तसेच कोलकात्यातील ग्रीनव्हॅली ॲग्रो यांचे प्रोप्रायटर या प्रकरणात आरोपी आहेत. या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढून ५ ते १५ टक्के नफ्याचे आमिष दाखवत ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सांगितले जायचे.

हॉटेल्समध्ये घ्यायचे सेमिनार
डॉ. प्रीती व तिचा पती डॉ. नीलेश यांनी वर्ध्यातील मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले होते व त्यानंतर त्यांच्या बोलण्याला फसून लोकांनी गुंतवणूक केली होती. आरोपींनी गुंतवणूकदारांना त्यांच्या डमी फर्मच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास सांगितले. सुरुवातीचा नफा मिळाल्यानंतर पीडितांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. नंतर गुंतवणूकदारांनी संकेतस्थळावरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश मिळाले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---