---Advertisement---
भारताला रशियासोबत मैत्री वाढवून काहीही मिळणार नाही, हुकूमशाही देश केवळ विस्तारवादाला प्राधान्य देतात. चीन, रशियाशी जवळीक साधताना पंतप्रधान मोदी यांनी आपण लोकशादी देशाचे नेते आहोत हे विसरू नये. अमेरिका आणि युरोपचा पाठिंबा मिळविल्यास भारताच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटले आहे.
एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीवर नवारो यांनी टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना नवारो म्हणाले, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा नेता हुकूमशहांसोबत कसा उभा राहू शकतो, हे समजण्यापलीकडे आहे.
आजच्या घडीला भारताला रशियाची नव्हे, तर अमेरिका, युरोप आणि युक्रेनची गरज आहे. भारत आणि चीनमध्ये दशकांपासून तणाव आहे. अनेकदा हा तणाव युद्धापर्यंत पोहोचला. आम्हाला आशा आहे की, भारतीय नेते अमेरिके सोबत द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी वाटाघाटी करतील.
भारताने अनेक दशकांपासून अमेरिकेच्या वस्तूंवर जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कर लादला. भारताने करार करण्यासाठी वाटाघाटीसाठी अडथळे आणल्यानेत आम्हाला आयात शुल्क लावण्याचा निर्णय घ्यावा लागला. चीन आणि रशियासोबतची मैत्री भारताला गोत्यात आणू शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.