जळगावकर लक्ष द्या! ‘हा’ मार्ग राहणार चार महिने बंद

अमळनेरहून धरणगाव कडे  जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी कुर्हे- सती माता मंदिर  याठिकाणी अंतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून  दूचाकी वगळता सर्व जड वाहनांसाठी पुढील  चार महिन्यांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. आता वाहनधारकांना आपला मार्ग बदलून अमळनेरहून धरणगाव कडे जाण्यासाठी ढेकू- सारबेटे मार्गाचा वापर करावा.

असे आवाहन अमळनेर रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.अमळनेरहून धरणगाव जातांना चांदणी कुर्हे- सती माता मंदिर येथे फाटक क्रमांक १३७ येथे एका बाजूच्या बोगद्याचे काम झाले आहे. या मार्गाने फक्त दुचाकींचा वापर सुरु ठेवण्यात आला असून एसटी, ट्रक, ट्रॅक्टर, मालट्रक  यांसारख्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.  धरणगाव जाण्यासाठी ढेकू-सारबेटे या पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.