---Advertisement---

ना. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून लोहारा ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारी, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

---Advertisement---

चंद्रकांत पाटील
लोहारा प्रतिनिधी : लोहारा कुऱ्हाड गटातील पन्नास वर्षावरील ७६० वारकऱ्यांना पंढरपूर वारी घडत आहे. नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून लोहारा ते श्रीक्षेत्र पंढरपूरचे दर्शन लाभ वारकऱ्यांना लाभत आहे . या वारीसाठी मंत्री महाजन यांच्याद्वारे एसटी महामंडळाच्या १७ बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या वारकऱ्यांसाठी भोजनाची व चहा नास्ता करण्यात आली आहे.

वारकऱ्यांना “विठ्ठलाचा वारकरी… जनतेचा सेवेकरी” आशा आशयाच्या टोप्या व ओळखपत्र देण्यात आले. लोहारा कुऱ्हाड गटासह जामनेर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनाही पंढरपुरी वारी घडवित असल्याचे गट प्रमुख शरद सोनार यांनी या वेळेस सांगितले.

---Advertisement---

श्री क्षेत्र पंढरपुर येथे जाण्यासाठी आपल्या गटातच बसची व्यावस्था करण्यात आल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केला. त्यांच्यात भक्तिमय आनंदाचे वातावरण दिसून आले. यावेळी वारकऱ्यांसह भाजपा कार्यकर्ते शरद सोनार, कैलास चौधरी,रमेश शेळके, शेनफडू कोळी, भगवान खरे, विकास देशमुख, सुरेश चौधरी, मुकेश पालीवाल, संतोष पालिवाल, हितेश पालीवाल, सुनील देशमुख, राधेश्याम पालीवाल, साहेबराव पाटील, नाना चौधरी, दीपक खरे, विवेक जाधव,रवी पाटील आदी उपस्थित होते. नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून होणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूर वारी दर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment