महाराष्ट्रातून ‘डीएड’ कायमचे होणार एक्सिट?, जाणून घ्या सविस्तर

 

तरुण भारत लाईव्ह न्युज l ३ एप्रिल २०२३ l : बारावी नंतर डी.एड.करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला डीएडचा अभ्यासक्रम कायमचं बंद होण्याची शक्यता आहे. जून २०२३ -२०२४ पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्राने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना बीएड करावे लागणार आहेत.यासोबत यामध्ये कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे याची निवड करता येणार आहे त्यानुसार सर्व अकृष विद्यापिठांमध्ये जून 2023-24 पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जाणून घ्या कसा असेल अभयसक्रम :-

दरम्यान नव्या शैक्षणिक धोरणात डीएडचा अभ्यासक्रम असणार नाही, तसेच
– पोस्ट ग्रॅच्युएट विद्यार्थ्यांना एका वर्षात बीएड करता येणार आहे.
– पदवी घेतलेल्या उमेदवारांना दोन वर्षात बीएड पूर्ण करता येणार आहे.

– बारावीनंतर बीएडसाठी चार वर्षे लागणार आहेत. यामध्ये कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे याची निवड करता येणार आहे.
दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत काही माहिती नाही. मात्र सर्वच पदवी अभ्यास क्रम चार वर्षांचे होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या महत्त्वाचा सर्वंकष विकास त्यातून घडणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.