ब्राह्मण समाजाच्या मागण्या पूर्ण करा; अन्यथा १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण : दीपक रणनवरे

नंदुरबार  परशुराम आर्थिक विकास महामंडळ व ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने दि. १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्यात येईल, अशी माहिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिली आहे.

जालना येथील गांधी चमन याठिकाणी दीपक रणनवरे यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण १४ डिसेंबर २०२३ रोजी केले होते. या उपोषणावेळी नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करूनही मागील सहा महिन्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन त्यासाठी १००० कोटीचा निधी व इतर मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले  होते. १ फेब्रुवारी रोजी इतिवृत्त तयार झाले, त्यामध्ये  ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास तरुण असा उल्लेख करून इतिवृत्त तयार वास्तविक पाहता ब्राह्मण समाजातील गरजूंना लाभ मिळायला हवा, परंतु तरुण आर्थिकदृष्ट्या मागास या शब्दाचा वापर करून शब्दछल करत इतिवृत्त बनवले. यावर संघर्ष समितीने हे दुरुस्त करून लवकर प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करुन दिलेल्या आश्वासनासह ब्राह्मण समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणुन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटीचा निधी तात्काळ देऊन महामंडळ कार्यान्वित करावे. अन्यथा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीतर्फे दि.१५ ऑगस्टपासून दीपक रणनवरे हे प्रातिनिधिक स्वरूपात आमरण उपोषण करणार आहे. त्यापूर्वी शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर उपोषण करण्यात येईल, असे संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दिपक रणनवरे, धनंजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी, विजया कुलकर्णी, ईश्वर दिक्षित, अॅड. राजेंद्र पोदार, अॅड. बलवंत नाईक, स्वप्नील केळकर, अशोक वाघ, उदय जोशी, अॅड. भानुदास शौचे, शाम कुलकर्णी, महेश अकोलकर, संतोष कुलकर्णी, संजय देशपांडे, किशोर पाठक, अॅड. शेखर जोशी, मंदार कुलकर्णी, स्वप्निल पिंगळे, अनिल डोईफोडे, सतीश ईडोळकर, अॅड. प्रज्ञ भिडे, अनिल दिक्षित यांनी सांगितले.