चोरीचे दागिने विकून पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमस्ती ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : कुलूपबंद घरांवर नजर ठेवत सोन्याचे दागिन्यांची चोरी करून ते विकून पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमस्ती करणाऱ्या आरोपी प्रशांत काशिनाथ करोशी (वय ३८, रा. मौजे इस्पुर्ती, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याला भडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने भडगाव येथून चोरलेले सोन्याचे दागिने रायपूर (छत्तीसगड) येथे व्यापाऱ्याला विकले होते. पोलिसांनी आरोपीला सोबत घेत रायपूर येथून सोनेचांदीचे दागिने व रोकड असा सुमारे ८ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. भडगाव पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवार, १ रोजी त्यांचे अभिनंदन केले.

१२ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी भडगाव येथील विद्यानगरातील प्रकाश दत्तात्रय भोसले (वय, ५९) यांच्या राहत्या घराचे वरच्या मजल्यावरील जिन्याचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १० लाख ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार या गुन्ह्याच्या तपासाला पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे तसेच पथकातील पोहेकॉ किरण पाटील, पो.कॉ. प्रवीण परदेशी, पो.कॉ. संदीप सोनवणे यांनी गती दिली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली. प्रशांत काशिनाथ करोशी याने ही चोरी केल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला वर्धा येथून पथकाने ताब्यात
घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला २५ जून रोजी अटक केली.

पत्नीचे दागिने सांगून विक्री
प्रशांत हा आंतरराज्यीय अट्टल घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याचेवर महाराष्ट्रात ५० तर कर्नाटकमध्ये चार असे एकूण ५४ गुन्हे दाखल आहेत. भडगाव येथील सोन्याचे दागिने चोरल्यानंतर त्याने हे एका सराफ व्यापाऱ्याकडे नेले. आईचे ऑपरेशन करायचे आहे. त्यासाठी पत्नीचे दागिने मोडण्यासाठी आणले, अशी थाप मारत त्याने व्यापाऱ्याला ते विकल्याची माहिती तपासातून समोर आली. पोलिसांनी व्यापाऱ्याकडे जाऊन हे चोरीचे दागिने हस्तगत केले.

गोवा, दिल्ली वास्तव्य
आरोपी प्रशांत हा चोरीच्या पैशांवर मौजमस्ती करत होता. गोवा, दिल्ली, बेंगलोर ये पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबून तो चैनी जीवन जगत होता. पोलिसांना चकमा देण्यासाठ त्याने ही शैली अंगीकारली असण्याची शक्यत पोलिसांनी व्यक्त केली. भडगाव घरफोडी तब्बल एक किलो चांदी त्याच्या हाती लागल होती. मात्र त्याने ती फेकून दिली. चांदीला त हात लावत नाही. रोकड आणि सोन्याचे दागिन चोरण्याची त्याची शैली होती, अशी माहित तपासातून समोर आली.

मोठ्या शहरात बंद घरावर डोळा
मोठ्या शहरातील कुलूपबंद घरे या चोरट्याच्या रडारवर असायची. ज्या शहरात चोरी करायची असेल त्या ठिकाणापासून जवळपास १०० किलोमीटर अंतरापासून त्याचा मोबाइल बंद करत असायचा. चोरीसाठ रेकी करणे, असे तो करत नव्हता. बंद घर दिसले म्हणजे ते हमखास फोडून सोन्याचे दागिने किंवा रोकड चोरूनच तो बाहेर पडत असायचा. यासाठी नेहमी तो कटर बाळगत असायचा. सात महिन्यानंतर हा गुन्हा पोलिसांन उघडकीस आणला. यात १२० ग्रॅम वजनाच सोन्याची लगड पोलिसांनी हस्तगत केली.