अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघात वरून राज जोरदार बरसत होत आहे. अशातच दुसरीकडे मंत्री अनिल पाटील यांनी निधीचा पाऊस पाडला आहे. मतदारसंघासाठी तब्बल 25.80 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे महत्वपूर्ण रस्ते व काही पुलांचे काम यातून मार्गी लागणार आहे.
येथील तहसीलदार निवासस्थानाची दुरावस्था झाल्याने अधिकाऱ्यांच्या निवासाची गैरसोय होत आहे. आता निवासस्थान बांधकामासाठी 80 लक्ष रुपये मंजूर झाल्याने नवे निवासस्थान यातून उभे राहणार असून, अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मंत्री अनिल पाटील यांनी शहर व ग्रामीण रस्त्यांच्या नुतनीकरणाकडे अधिक लक्ष दिल्याने बहुसंख्य रस्ते नवीन झाले. यामुळे ग्रामिण भागाचा शहराशी संपर्क वाढून शेतकरी बांधवाना शेती पूरक व्यवसाय करण्यास वाव मिळत आहे.
तसेच शहरात नवीन रस्त्यांच्या मालिकेमुळे नागरिक समाधानी झाले आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्वपूर्ण ग्रामीण रस्त्यांच्या मंजुरीसाठी मंत्री पाटील यांनी पाठपुरावा केला होता त्यास यश येऊन 55.80 कोटी निधीची बहुसंख्य कामे मंजूर झाले आहेत.
मंजूर कामे व निधी
1) मुसळीफाटा धरणगांव अमळनेर शिदखेडा रस्ता रामा क्र. 6 कि.मी. 46/00 ते 47/300 व 49/300 ते 51/00 ची सुधारणा करणे ता.अमळनेर जि.जळगांव. ( भाग-गलवाडे ते भरवस)
रक्कम 250.00 लाख
2) मुडी प्र.डांगरी लोण, आर्डी, खडके, निसर्डी, लोंढवे, शिरुड फ़ाफ़ोरे रस्ता प्रजिम127 कि.मी. 32/700 ते 33/00 ची पुलाच्या पोहच रस्त्याची सुधारणा करणे ता अमळनेर जि.जळगाव (कुर्हे खु) रक्कम 80.00 लाख
3) मांडळ, जवखेडा, आर्डी, आनोरा, पिंपळे, मंगरूळ, शिरुड, कावपिंप्री रस्ता प्रजिमा 129 कि.मी. 11/00 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे. ता.अमळनेर जि.जळगाव (आनोरे गावाजवळ) रक्कम 100.00 लाख
4) एरंडोल, कल्याणे खु, मठगव्हाण, जळोद, मांडळ रस्ता प्रजिमा ५२ कि.मी. 35/600 ते 38/250 ची सुधारणा करणे ता.अमळनेर जि.जळगांव. (भाग- धावडे ते सावखेडा) रक्कम 180.00 लाख
5) मुडी प्र.डांगरी, लोण, वावडे, आर्डी, निसर्डी, लोंढवे शिरुड, फ़ाफ़ोरे, कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे सारबेटे रस्ता प्रजिमा 127 कि.मी. 3/200 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे ता.अमळनेर जि.जळगाव रक्कम 200.00 लाख
6) बोळे, मोंढाळे, बहादरपूर, फाफोरे, अमळनेर रस्ता प्रजिमा 49 कि.मी. 23/00 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे ता.अमळनेर जि.जळगांव. (आंबापिंप्री गावाजवळ) रक्कम 200.00 लाख
7) बोळे, मोंढाळे, फ़ाफ़ोरे, अमळनेर मारवड, कपिलेश्वर रस्ता प्रजिमा 49 कि.मी. 36/600 मध्ये लहान पुलाचे बंधकाम करणे ता.अमळनेर जि.जळगाव रक्कम 200.00 लाख
8) एरंडोल, कल्याणे खु, मठगव्हाण, जळोद, मांडळ रस्ता प्रजिमा ५२ कि.मी. 46/00 ते 49/00 ची सुधारणा करणे ता.अमळनेर जि. जळगांव. (भाग- मठगव्हाण ते जळोद) रक्कम 200.00 लाख
9) रा.मा. 39 ते जांभोरा, ढेकु, हेडावे, अमळनेर, शिरसाळे, वावडे रस्ता प्रजिमा 51 कि.मी. 26/600 ते 29/600 ची सुधारणा करणे ता.अमळनेर जि.जळगांव (भाग- ढेकु ते शिरसाळे) रक्कम 250.00
10) मुडी प्र.डांगरी, लोण, आर्डी, खडके, निसर्डी, लोंढवे शिरुड, फ़ाफ़ोरे रस्ता प्रजिमों 127 कि.मी. 10/450 ते 13/00 ची मजबुतीकरणा सह सुधारणा करणे ता.अमळनेर जि.जळगाव (लोण ते वावडे) रक्कम 250.00 लाख
11) मांडळ, जवखेडा, आर्डी, आनोरा, पिंपळे, शिरूड, कावप्रिप्री रस्ता प्रजिमा 129 कि.मी. 19/00 ते 23/00 ची सुधारणा करणे ता.अमळनेर जि.जळगांव. (भाग- मंगरुळ ते कावपिंप्री) रक्कम 290.00 लाख
12) एरंडोल, कल्याणे खु मठगव्हाण, मुडी, मांडळ रस्ता प्रजिमा 52 किमी. 96/00 ते 98/300 ची सुधारणा करणे. ता.अमळनेर जि.जळगांव (भाग- मुडी ते मांडळ)
रक्कम 300.00 लाख
13) अमळनेर जि.जळगाव येथे तहसीलदार (प्रकार-4) यांच्या निवासस्थानाचे बांधकाम करणे ता.अमळनेर
रक्कम 80.00 लाख. अश्या एकूण- 25 कोटी 80 लाखांच्या कामाचा समावेश आहे.
सदर मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन,जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.