---Advertisement---

jalgaon news: रस्त्याची वाताहत, एक कोटी दहा लाखांचा निधी पाण्यात

by team

---Advertisement---

जळगाव : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भुसावळ-यावल रस्त्यासाठी अर्थसंकल्पीय निधीतून एक कोटी 10 लाखांचा निधी मंजूर झाला व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत मार्च-एप्रिल 2021 मध्ये डांबरीकरण करण्यात आले मात्र अवघ्या सहा महिन्यात रस्ता खिळखिळा झाल्यानंतर माध्यमांनी लक्ष वेधताच सप्टेंबर 2021 डागडुजी करण्यात आली, मात्र त्यानंतर वाहनधारकांची उपेक्षा कायम राहिली. सप्टेंबर 2022 मध्ये पुन्हा थातूर-मातूर डागडूजी केल्यानंतर आता जुलै 2023 मध्ये पुन्हा रस्ता पूर्णपणे खिळखिळा झाल्याने वाहनधारक संंतप्त झाले आहेत. वारंवार रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी आता काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.

रस्त्यावर सर्वदूर पडले खड्डे
भुसावळ शहरातील वर्दळीच्या यावल रोडची स्थिती अत्यंत बिकट झाल्याने आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केल्यानंतर अर्थसंकल्पीय निधीतून एक कोटी 10 लाखांचा निधी मंजूर होताच रस्त्याचे काम मार्च – एप्रिल 2021 मध्ये करण्यात आले. यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोरील यावल रस्त्यापासून तापी नदीपर्यंतच्या एकूण दोन हजार 300 मीटर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात त्यावेळी रस्ता उखडल्याने ओरड होताच पॅचवर्क करण्यात आले तर गतवर्षीदेखील डागडूजी करणयात आली मात्र यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा रस्त्याची ‘जैसे थे’ अवस्था झाल्याने वाहनधारक संतप्त आहेत.

वाहतुकीच्या निकषानुसार आता काँक्रिटीकरणाची अपेक्षा
पयावल रोडच्या डांबरीकरण कामासाठी दोन-तीन वर्षांनी या रस्त्याच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. या मार्गावर अजवड वाहतूक अधिक असते मात्र रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होत नसल्याने लाखोंच्या निधीचा चुराडा होतो. अवजड वाहतूकीच्या निकषांनुसार रस्ता होत नसल्याने तो

भुसावळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह!
पयावल रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत असतानाही संबंधित ठेकेदारावर कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून का केली जात नाही? असा प्रश्न आहे. या रस्त्याच्या कामासाठी विरोधकांनी आंदोलनही केले मात्र त्यांनीदेखील तोंडावर बोट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खराब रस्त्याची अवस्था अधिकार्‍यांना नजरेस पडत नाही का? सा.बां.अधिकार्‍यांची ठेकेदारावर मेहेरनजर का? असा प्रश्न सुज्ञ भुसावळकर उपस्थित करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---