चोपडा मतदारसंघासाठी महिनाभरातच बाराशे कोटींचा निधी – प्रा. चंद्रकांत सोनवणे

अडावद, ता. चोपडा :  चोपडा विधानसभा मतदार संघासह तालुक्याच्या विकासासाठी गेल्या साडेचार वर्षांत हजारो कोटींची विकासकामे मार्गी लागली आहे.  आता अवघ्या महिनाभरातच मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाच्या विविध कामांसाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे आणि ही फक्त घोषणा नसून प्रत्यक्ष कामांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला व भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी येथील जाहीर सभेत केले.
                    येथे काल बुधवार, दि. २४ रोजी सायंकाळी आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या ४० लाखाच्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन सोहळानिमित्ताने क्षत्रिय माळी समाज व पंच मंडळातर्फे आयोजित आभार सभेत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.  महाराष्ट्र शासनाने जनतेसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे सोनवणे यांनी तोंडभरुन कौतुक केले.  विरोधकांच्या कार्यकाळात चोपडा तालुका सुमारे पस्तीस वर्षे मागे पडला. तो बॅकलॉग दहा वर्षांत भरुन काढण्याचा आम्ही प्रयत्न केला असेही ते पुढे म्हणाले. उपसा सिंचन, रस्ते, वसतिगृह, पिण्याचे पाणी, आदिवासी भागातील रस्ते यासाठी महिनाभरातच बाराशे कोटी रुपयांचा भरीव निधी आमदार लता सोनवणे यांनी खेचून आणल्याचा गौरवोद्गार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केला.
                       यावेळी व्यासपीठावर पं. स.चे माजी सभापती रमेश पवार, सरपंच बबनखा तडवी, उपसरपंच रवींद्र चव्हाण, माजी सरपंच भावना माळी, भारती महाजन, विजिता पाटील, नायजाबाई पावरा, देवसिंग पावरा, विठ्ठल बारेला, रंजना भोई, साखरलाल महाजन, नामदेव पाटील, भगवान महाजन, हनुमंत महाजन, लोकेश काबरा, संजय पाटील, एम. के. शेटे, पंकज महाजन आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम आ. लता सोनवणे यांच्याहस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती. यानंतर येथील दुर्गादेवी चौकात जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला महिला, पुरुष, आबालवृद्धांची गर्दी होती.
                         याप्रसंगी सूर्यभान पाटील, प्रवीण कोळी (पंचक), जीवन माळी, सचिन महाजन, पी. आर. माळी,  हरिष पाटील, पी. डी. महाजन, नरेंद्र पाटील, संजय महाजन, दगडू महाजन, संदीप महाजन, बापू कोळी, सुरेश बाहेती, जावेद खान, कालु मिस्तरी, मंगल इंगळे, रामकृष्ण महाजन, सूर्यकांत महाजन, पी. डी. सैंदाणे यांसह क्षत्रिय माळी समाजाचे ग्रामस्थ, पदाधिकारी व पंचमंडळाचे संचालक उपस्थित होते. प्रास्ताविक पी. आर. माळी यांनी  सूत्रसंचालन एस. जी. महाजन तर आभार सचिन महाजन यांनी मानले.