धुळे: तालुक्यातील रस्ता दुरुस्तीसाठी केंद्राकडून 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे. धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र (राम ) भदाणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या कामांची लवकरच निविदा निघणार असल्याची माहिती आ. भदाणे यांनी दिली आहे.
शहराला जोडणारे तालुक्यातील सर्व रस्ते चकचकित व दर्जेदार करण्यासाठी आमदार राम भदाणे यांनी नियोजन केले आहे. रस्ते दुरुस्ती साठी केंद्रा कडून जास्तीत जास्त निधी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु आहे. नुकताच त्यांनी बोरिस ते निकुंभे -ढढाने- धोंडी, नगाव- बिलाडी-जापी- शिरढाने-नावरा- नावरी या रस्तासाठी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे पाठपुरावा केला होता. पाठपुरावाची दखल घेत रस्ते दुरस्ती साठी केंद्राने १५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तालूक्यातील रस्ता दुरुस्ती साठी निधी मंजूर झाल्या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
तालुक्यातील बोरिस ते निकुंभे मार्गे नावरा नवरी पर्येंत या रस्तावरती रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी व व्यावसायिकांसाठी हा मार्ग सोयस्कर आहे. तालुक्यातील अनेक रस्ते दुरुस्तीसाठी नियोजित आहेत. त्यासाठी केन्द्र कडून निधी प्राप्तीसाठी पाठपुरावा सुरु आहे. मंजूर कामांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा काढून काम जलद गतीने करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार राम भदाणे यांनी दिली आहे.