G20 शिखर परिषद समाप्त होताच, जाणून घ्या काय म्हणाला किंग खान

नवी दिल्ली:  भारतामध्ये दिल्ली येथे  G20  शिखर परिषद  संपण्याची घोषणा करण्यात आली आहे. ९ आणि १०  सप्टेंबर रोजी झालेल्या या शिखर परिषदेत जभरातील  मोठमोठ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी हजेरी लावली होती. ही  शिखर परिषद दोन दिवस चालली  9 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय G20 शिखर परिषदेचा समारोप घोषित करताना, PM मोदींनी G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलच्या राष्ट्रपतींना सुपूर्द केले.व यापुढील जबाबदारी ब्राझील दिल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही परिषद यशस्वीरित्या पार पडली त्यामुळे सर्वच नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. आता बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. किंग खान यांनी त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या यशाबद्दल आणि जगातील लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी राष्ट्रांमध्ये एकता वाढवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन.यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. मोदी सर तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही एकटे नाही तर एकात्मतेने समृद्ध होऊ. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य…