---Advertisement---

प्राणघातक शस्त्र बाळगणारा गजाआड

by team

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी वय २२, रा. शिरसोली नाका तांबापुरा, जळगाव. असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल होता, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलीस सूत्रानुसार, पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांना एमआयडीसी पोलिसांत नं.८६७/२०२२ आर्म ऍक्ट कलम ४/२५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी वय २२, रा. शिरसोली नाका तांबापुरा जळगाव हा  शहरातील शिरसोली नाका, तांबापुरा येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकांना रवाना करून त्यास प्राणघातक शस्त्रसह ताब्यात घेण्यात आले.

पोलीस अधिक्षक एम रामकुमार, जळगाव व अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित, जळगाव भाग जळगाव व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचा मार्गदर्शनाखाली सफ आनंदसिंग धर्मा पाटील, पोहेकॉ अल्ताफ पठाण, पोना गणेश शिरसाळे, पोना संचिना पाटील, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोकों छगन तायडे, पोकॉ मुकेश पाटील, पोकों राहुल रगडे, पोकों विशाल कोळी यांनी ही कारवाई केली, गुन्हाचा पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---