---Advertisement---

गल्ली में चोर घुम रहे है, हम पोलिस उन्हे धुंड रहे है, धुळ्यात व्यापाराला तोतया पोलीसांनी लुटले

by team
---Advertisement---

धुळे : शहरात भरदिवसा चार तोतया पोलिसांनी व्यापार्‍याची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. गल्ली में चोर घुम रहे है, हम पोलिस उन्हे धुंड रहे है, तुम्हारे पास जो दागिना है वो हमारे पास दे दो, असे सांगत व्यापाराकडील 1 लाख 10 हजारांचे दागिने चलाखीने गायब केले. याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यापारी सुनिल घेवरचंद भंसाळी (वय 58 रा. गल्ली नं. 4, सराफ बाजार, धुळे) हे काल सकाळी 8.20 वाजता मंदिरातून घरी परत येत होते. तेव्हा गल्लीमध्ये चार अनोळखी इसमांनी त्यांना आम्ही पोलिस असल्याची बतावणी केली. गल्ली में चोर घुम रहे है, हम पोलिस उन्हे धुंड रहे है, तुम्हारे पास जो दागिना है वो हमारे पास दे दो, असे सांगत भिती घातली. त्यांच्याजवळील 80 हजारांच्या सोन्याच्या पाटल्या व 30 हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या फसवणूक करून काढून घेतल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षाच येताच भंसाळी यांनी आझादनगर पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगितली. पोना कढरे पुढील तपास करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment