Ganesh Chaturthi Celebration: अर्पिता खानच्या घरी बाप्पा झाले विराजमान , सलमानने केली भाचीसोबत गणरायाची आरती

सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी शनिवारी त्यांच्या घरी गणेश चतुर्थी साजरी केली, यावेळी सलमान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब गणपती बाप्पाच्या आरती आणि पूजेसाठी अर्पितच्या घरी उपस्थित होते. गणपती बाप्पाच्या आरतीला सलमानचे वडील सलीम खान, भाऊ अरबाज आणि सोहेल खानही उपस्थित होते. यावेळी अर्पिता खानचे संपूर्ण कुटुंब दिसले. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान देखील गणपतीच्या सेलिब्रेशनमध्ये दिसले होते. व्हिडिओमध्ये सोहेल खानची मुले निर्वाण आणि योहान खानही पोहोचले. सर्वांनी मिळून पूजा केली. सलमान खानने भाची आयतसोबत आरती केली. सलमान तपकिरी शर्ट आणि पांढऱ्या पँटमध्ये दिसला. अभिनेता वरुण शर्मा, ऑरी आणि युलिया वंतूर देखील या पूजेचा भाग झाले.