तरुणीवर सामूहिक अत्याचार; मित्राच्या घरी नेलं अन्.., काही तासांतच आरोपींना अटक

मुंबई : मुंबईमध्ये धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून सहा आरोपीपैकी तीन आरोपी अल्पवयीन आहे. त्या अल्पवयीन आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. इतर तीन ओरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींनी ३० डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

सूत्रानुसार, १५ वर्षीय तरुणीला तिच्या मित्राने दुसऱ्या एका मित्राच्या घरी बोलावले. तिथे गेल्यानंतर पीडितेवर ६ आरोपींनी अत्याचार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने घरी धाव घेत आपल्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि अवघ्या काही तासांत ६ जणांना बेड्या ठोकल्या.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून आणखी पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला जात असून अधिक तपास सुरू आहे.