---Advertisement---

अडीच लाखांचा गांजा जप्त; एकास अटक, गुप्त माहितीवरून पोलिसांचा छापा

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । बेकायदेशीररित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. बसस्थानक परिसरात २२ रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात सुमारे 2 लाख 30 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अमळनेर पोलीसांत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना दोन व्यक्ती बेकायदेशीररित्या गांजाची अमळनेर बसस्थानक परिसरातून वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कोठावदे, पोहेकॉ किशोर पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील, मिलिंद भांबरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत शिसोदे, पोकॉ हर्षल पाटील, विलास बागुल यांनी गुरूवारी २२ डिसेंबर रोजी रात्री अमळनेर बसस्थानक परिसरात छापा टाकला.

या छाप्यात सुमारे 2 लाख 30 हजार रुपये किमतीचा 15 किलो 566 ग्रॅम वजनाचा ओला गांजा जप्त केला असून या कारवाईत राधेश्याम रामसिंग पावरा रा. हिसाडे ता. शिरपूर जि. धुळे याला ताब्यात घेतले.

दरम्यान दुसरा साथीदार सुरेश साहेबराव भदाणे रा. हिसाळे ता. शिरपूर जि.धुळे याने पळ काढला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेतील राधेश्याम पावरा याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment