---Advertisement---

Garlic Health Benefits : फंगल इन्फेक्शन ते हृदयविकाराच्या समस्येवर लसूण आणि मधाचे सेवन ठरते रामबाण

---Advertisement---

Garlic Health Benefits : भारतातील बहुतांश व्यंजनांमध्ये लसणाचा वापर केला जातो. विशेषतः मसालेदार पदार्थांची चव वाढवण्यास लसूण मदतगार ठरतो. लसूण हा फक्त पदार्थांची चव वाढवत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहे. त्यात लसूण आणि मध एकत्र करून खाणे आरोग्यासाठी संजीवनी ठरते. तसेच सौंदर्यासंबंधी समस्या देखील दूर होतात. आजचा आपला हा लेख त्याच विषयावर असून जाणून घेऊया लसूण आणि मध खाण्याचे काय आहेत फायदे.

सर्दी दूर होते

लसूण आणि मधाचे एकत्र सेवन केल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते कारण त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात सर्दी आणि पडसंसह सायनसची समस्या दूर होते. लसूण आणि मधाचे मिश्रणाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढवते आणि आजारांना दूर ठेवते.

निरोगी हृदय राहते

लसूण आणि मधाचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. या दोन्हीमध्ये असे अनेक घटक असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हृदय रुग्णांनीही याचे सेवन करावे. यामुळे रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत हृदयापर्यंत रक्त सुरळीत पोहचते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. अशात आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत असली पाहिजे. अशातच लसूण आणि मधाच्या मिश्रणाचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये तंदुरुस्त राहू शकतात.

डायरियापासून बचाव होतो

ज्या व्यक्तींना सतत डायरियाचा त्रास होतो त्यांच्यासाठी मध आणि लसणाचे मिश्रण प्रभावी ठरते. याचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते तसेच पोटातील इन्फेक्शन दूर होऊन आराम मिळतो.

फंगल इन्फेक्शन दूर होते

शरीराच्या कोणत्याही भागात फंगल इन्फेशन झाल्यास त्या ठिकाणी लसूण आणि मधाचे मिश्रण लावावे कारण लसूण आणि मध या दोन्हीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे जंतू संसर्ग दूर होतो.


(टीप : लेखात दिलेला सल्ला हा सामान्य आणि उपलब्ध माहितीच्या आधारावर आहे. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment