IND vs AUS Test : गौतम गंभीर अचानक भारतात परतला; पर्थ कसोटी जिंकताच असं काय घडलंय?

India vs Australia Test: पर्थ कसोटीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, भारतीय संघांचा मुख्य कोच गौतम गंभीर भारतात परत येत आहेत. गौतम गंभीर रिर्टन का येत आहेत? अचानक काय घडलं? असे अनेक प्रश्न आहेत. पण तो परत यरण्यामागे व्यक्तीगत कारण असल्याच समजतय.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसरा सामना खेळणार आहे. भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी बुधवारी कॅनबेराच्या दिशेने रवाना होणार आहे. तिथे दोन दिवसीय पिंक बॉल सराव सामना खेळणार आहे. 27 नोव्हेंबरला टीम इंडिया कॅनबराला जाईल. हा सामना शनिवारपासून सुरु होईल. गौतम गंभीर यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक कोच अभिषेक नायर, बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल, फिल्डिंग कोच टी. दिलीप ट्रेनिंग सेशनवर नजर ठेवतील.

गौतम गंभीर वैयक्तिक कारणामुळे मंगळवारी मायदेशात परतणार आहे आणि दुसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी तो पुन्हा ऑस्ट्रेलियात दाखल होईल. गंभीरने भारतात येण्यामागे वैयक्तिक कारण सांगितले आहे आणि बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली आहे,’असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.