तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत भेटीवर आलेल्या जर्मनीचे परराष्ट्रमंत्री ऍनालेना बेअबॉक यांनी भारताचं कौतुक केलं आहे. बेरबॉक हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. भारतात ते अक्षय ऊर्जेच्या विविध प्रकल्पांना भेटी देणार आहेत. याचा ग्रामीण भागावर कसा परिणाम झाला आहे याची माहिती देखील ते घेणार आहेत.
ऍनालेना बेअबॉक काय म्हणाल्या?
जगातील अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल आहे. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये सेतू म्हणूनही भारत काम करत आहे. त्या पुढे म्हणाला की, गांधी स्मृतीला भेट देत आजपासून माझा भारत दौरा सुरु होत आहे. भारताच्या उच्च ऐतिहासिक वारशानं मला नेहमीच प्रभावित केलं आहे. आज मी गांधीजींबद्दल जाणून घेतल्यानतंर भारताला स्वातंत्र मिळवणं खरचं इतक सोप्प नव्हतं हे कळालं आहे.
महात्मा गांधीच्या हत्येला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. पण भारताच्या लोकशाही आणि आमच्या लोकशाहीचे खूपच जवळच बंध आहेत. मुल्यांची जोपासणा, मानव हक्क, स्वातंत्र, लोकशाही आणि कायद्यावरचा विश्वास या गोष्टींवर हे बंध आधारित आहेत.