---Advertisement---

बीड कारागृहात राडा; वाल्मिक कराडसह घुलेला मारहाण ?

by team
---Advertisement---

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि या हत्येतील इतर आरोपी हे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. या कारागृहात राडा झाला आहे. या राड्यात वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती आहे. परळीच्या गोळीबार घटनेत फरार आरोपी बबन गीते याच्या समर्थक कैदी विरोधी गटातील कैद्यांना भिडल्याने कारागृहातच या दोन्ही गटात राडा झाला. 

महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांकडून कराड, घुले या दोघांना मारहाण झाल्याची माहिती आहे. महादेव गित्ते आणि अक्षय आठवले हे आरोपी देखील मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे.ते दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे. तुरुंग प्रशासनाने या माहितीला दुजोरा दिलेला नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment