Girish Mahajan : जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न लागणार मार्गी : मंत्री महाजनांची माहिती

जळगाव : जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वेसंदर्भात विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांवर उपाययोजनाबाबत  शनिवार, २२ रोजी भुसावळ येथे डी.आर.एम. कार्यालयात चर्चा करण्यात आली. या चर्चेत जिल्ह्यातील नामदार व आमदार हे सहभागी झाले होते. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील रेल्वेसंदर्भांतील प्रश्न आगामी दोन तीन महिन्यात मार्गी लागणार असल्याची माहिती दिली.

भुसावळ येथे मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात ना. गिरीश महाजन, जळगाव लोकसभा नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, मनोज बियाणी  हे उपस्थित होते. हि चर्चा सुमारे दोन तास चर्चा चालली.  यात जिल्ह्यातील रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पाचोरा, जामनेर ब्रॉडगेज असो की बोदवड पुला खाली पाणी, सावदा ते शेड इतर प्रश्नांवर चर्चा झाली. भुसावळ रेल्वे स्थानकाला लागून बसस्थानकअसून बस स्थानकाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.

सध्या बस स्थानकाच्या समोर असलेली रेल्वेची जागा अदलाबदल करायची आहे. बरेच दिवसांपासून भुसावळकर नागरिक त्रस्त झाले आहे. परंतु, या ठिकाणी फक्त बस स्थानक नाही तर बसपोर्ट करायचे असून एका महिन्याच्या आत या जागेचा वाद सोडविला जाईल. यानंतर जागा एक्स्चेंज करण्यात येईल असे,मत ना. गिरीश महाजन यांनी  व्यक्त केले.