जळगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जळगाव जिल्हा दूधयुक्त कसा करता येईल, शेतकऱ्ंयांना शेतीसोबत दूग्ध व्यवसाय पुरक कसा करता येईल, याबाबत आमचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या बैठकीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आम्ही तुम्हाला मंगेश चव्हाण यांच्या रूपाने एक चांगला कार्यकर्ता दिला आहे. जो प्रामाणिकपणे काम करतो. संचालक मंडळ भ्रष्टाचार करणार नाही असा विश्वास देखील गिरीश महाजन यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केला. आम्हाला घरी, तूप, लोणी, दूध पावडर घरी घेऊन जात नाही. संघाची गाडी, चालक वापरत नाही. याकरीता दूध संघ नसून दूध उत्पादकांच्या आयुष्यात बदल घडवून आणयाचा आहे, या करीता आम्ही सूचना मागवल्या. माझे स्वप्न आहे की, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी म्हटले पाहिजे की, जळगावकडे बघा अशी आमची मानसिकता आहे. संघात काही बदल करायचे आहेत, त्याबाबत सूचना मागविल्या आहेत.
जसे व्यावसायिक दृष्टीकोन वाढीस कसा वाढवता येईल, दूधसोबत इतर उत्पादन घेता येईल का? त्याचे प्रमोशन कशा प्रकारे करता येईल. विकास दूध हे महाराष्ट्रात एक मोठे नाव आहे. दूधापासून नवनवीन उत्पादन घेतल्यास दूध संघ अतिशय पुढे जाईल, भरभराटीला येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही आठ कोटींचा तोटा हा दोन कोटींवर आणला आहे. मात्र, आ.एकनाथ खडसे हे फेक विधाने करीत असून, त्यांनी आपले डोके तपासून घ्यावे, अशी टीकाही ना. महाजन यांनी केली.