धुळे: जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात होळनांथे गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अविवाहित मुलीने स्वतःच्याच घरातून आईचे तब्बल साडेचार लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आईनेच आपल्या मुलीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
घटनेचा तपशील
यासंदर्भात संगीताबाई प्रवीणसिंग राजपूत (वय ५०, रा. होळनांथे, ता. शिरपूर) यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, १८ ते २३ फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या २५ वर्षीय मुलीने, नम्रता राजपूत हिने, घरातून मौल्यवान दागिने आणि रोकड चोरून नेली. चोरी झालेल्या वस्तूंची किंमत पुढीलप्रमाणे आहे
हेही वाच : आनंदाची बातमी! राज्य शासनाकडून ‘नमो किसान सन्मान निधी’त वाढ; शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार…
- सोन्याच्या दोन पाटल्या (४० ग्रॅम) – १.२० लाख रुपये
- सोन्याच्या दोन साखळ्या – ९० हजार रुपये
- सोन्याचा चपला हार (२० ग्रॅम) – ५० हजार रुपये
- सोन्याची अंगठी आणि टोंगल – ५६ हजार रुपये
- रोख रक्कम – १.२५ लाख रुपये
एकूण चोरीचा आकडा – ४ लाख ४१ हजार ५०० रुपये
आईने दिली पोलिसांत तक्रार
चोरी झाल्याचे लक्षात येताच संगीताबाईंनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या संशयास्पद वागणुकीमुळे त्यांच्यावर संशय बळावला. अखेर त्यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात धाव घेत मुलीविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला
तक्रारीच्या आधारावर थाळनेर पोलिसांनी मुलगी नम्रता राजपूत विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, चोरीला गेलेल्या दागिन्यांचा आणि रोकडीचा तपास सुरू आहे.