चंद्रपूर : प्रेमात वेडी असलेली व्यक्ती काय करेल हे सांग कठीण आहे. चंद्रपूरमध्ये पहिल्या प्रेयसीला दुसऱ्या प्रेयसीच्या वडिलांनी छेडछाड केली म्हणून दोघं प्रेयसीच्या प्रियकराने प्रेयसीच्या वडिलांची हत्या केली. या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर हादरलं, विकास गणवीर (वय ४५) असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रानुसार, विकास गणवीर यांची मुलगी आरोपी याची दुसरी प्रेयसी होती. आरोपीचे नाव प्रथमेश वाढई (वय २०) असं आहे. आरोपी वाढई याचे दोन मुलींसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. पहिल्या प्रेयसीला दुसऱ्या प्रेयसी संदर्भात माहिती झाल्याने तिच्या घरी जाऊन ती चर्चा करत होती. चर्चा करत असताना तिच्या वडिलांनी पहिल्या प्रेयसीला छेडछाड केल्याचं तीने प्रियकर आणि आरोपी प्रथमेशला सांगितलं.
त्यांनतर प्रथमेश याने दुसऱ्या प्रेयसीच्या वडिलांना पोलीस स्टेशनच्या जवळ गाठलं. तिथेच त्याने त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्या झाल्याची माहिती कळताच एकच खळबळ उडाली. त्यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस घटनास्थळी पोहचत आरोपीला ताब्यात घेतलं. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत.