राज्यातील मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

चालू शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी; व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश

मुंबई : चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यातील मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा अतिरिक्त अर्थसंकल्पासून करण्यात आली. विशेष म्हणजे त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाविषयी माहिती देताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे.

अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती केली जाईल.

या निर्णयाचा सुमारे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ होईल. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 2 हजार कोटी रुपयांचा भार पडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.