---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : शेतकऱ्यांना योजना देत असताना जात निहाय योजना नको फक्त शेतकरी म्हणुन योजना मिळाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भाचे निवेदन जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार, २७ रोजी देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, भारत हा कृषीप्रधान देश असून यात सर्व कृषी बांधवांना समान दर्जा दिला पाहिजे. त्यांना शेतीशी निगडीत असलेल्या सर्व योजनांविषयी लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार असून तो त्याला मिळायलाच हवा.
शासनाकडुन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. मात्र, काही योजनांमध्ये विशिष्ट जातींना प्राधान्य दिले जाते. असे न करता या योजनांमध्ये सर्व शेतकऱ्यांचा समावेश करण्यात यावा . जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीला जोडव्यवसाय म्हणुन प्रत्येक शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतो. त्यातुन त्याला चांगल्या प्रमाणात पैसा मिळु शकतो त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
शेतीमध्ये नैसर्गिक उदभवणाऱ्या आपत्तीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता योजनामधील जाचक अटी रद्द केल्यास शेतकऱ्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील, तालुका संघटक विलास सोनार, तालुका सचिव मनोज लोहार, हर्षल वाणी, संदिप मांडोळे आदी उपस्थित होते.