आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत द्या : ‘या ‘ नागरिकांचे पालकमंत्र्यांना साकडे

धरणगाव :  नगरपालिका हद्दीबाहेरील चिंतामण मोरया परिसरात अनेक नागरिक गेल्या 30 वर्षापासून राहत आहेत. हा परिसर धरणगाव नगरपालिका हद्दीत येत नसल्यामुळे या  भागातील लोकांना कोणत्याही प्रकारच्या नागरिक सुविधा मिळत नाही. यामुळे या नागरिकांनी  चिंतामणी परिसरासाठी नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी अशी  मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. पालकमंत्र्यांना नागरिकांनी गायत्री मंदिरात बैठकीसाठी आमंत्रित केले होते. 

बैठकीमध्ये धरणगाव बेघर संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. व्ही. एस. भोलाणे तसेच समितीचे सचिव रवींद्र कंखरे तसेच ऍड. हरिअर पाटील, ज्येष्ठ निवृत्त शिक्षक दगडू आबा सूर्यवंशी, निवृत्त मुख्याध्यापक संजीव कुमार सोनवणे तसेच माजी नगराध्यक्ष हे प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. 

ऍड. व्ही. एस. भोलाने यांनी चिंतामणी परिसरातील भागासाठी नागरिक सुविधा मिळत नसल्यामुळे या भागासाठी नवीन ग्रामपंचायत स्थापन करावी अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.  यावेळी रवींद्र कंखरे तसेच माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील तसेच ऍड. हरिअर पाटील यांनी  मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांनी चिंतामणी परिसरातील नागरिकांना खात्री दिली की, या भागासाठी निश्चितच ग्रामपंचायत होण्यासाठी मी मदत करेल.  जेणेकरून या परिसरातील राहणाऱ्या लोकांना नागरिक सुविधा मिळण्यासाठी मदत होईल.  तसेच त्यांनी या भागासाठी रस्त्यावरती मुरूम टाकण्याबाबत त्वरित आदेश दिले. 

त्यानंतर नागरिकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांना चिंतन मोरया परिसरासाठी ग्रामपंचायत होणे बाबतचे निवेदन दिले यावेळी चिंतामणी परिसरातील श्री रमेश गुरुजी महाजन दगडू आबा सूर्यवंशी तसेच एडवोकेट व्ही एस भोलाने रवींद्र भाऊ कंखरे ज्येष्ठ शिक्षक वाय जी पाटील जय गुरुदेव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही बी चौधरी  निवृत्त मुख्याध्यापक संजीव कुमार सोनवणे तसेच लोकमतचे पत्रकार भगीरथ माळी तसेच दिव्य मराठीचे पत्रकार बी आर महाजन व महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी हजर होते